सोलापूर बातमी

विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी कधी करणार महाराष्ट्र कामगार सेनेचे कामगार मंत्री श्री खाडे यांना निवेदनाद्वारे सवाल

सोलापूर सह महाराष्ट्रातील विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री श्री खाडे यांना कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे मुंबई येथील सुवर्णगड या बंगल्यात देण्यात आले.
सदर निवेदनात सोलापुरात गेल्या २२ वर्षापासून विडी कामगारांना कारखानदार किमान वेतन देत नाही म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्याचबरोबर महिला बिडी कामगारांना मजुरी वाढीसाठी शासन विडी मालक व कामगार प्रतिनिधी यांचे बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी करण्यात आली यावेळेस मंत्री महोदयांनी लवकरच विडी कामगारांच्या प्रश्नासाठी बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले कामगार मंत्री श्री खाडे साहेब यांना विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर
प्रा. श्रीशैल वाघमोडे , यांचा समावेश होता.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel