सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, लोकशाही वाचविण्यासाठी, विद्यार्थ्यांनी NSUI विद्यार्थी काँग्रेस मध्ये सहभागी व्हावे :- अर्जुन चपराना

संघटना मजबूत करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा :- अक्षय यादव

NSUI विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष वरून चौधरी यांच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांच्या अडचणी, पदाधिकाऱ्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी NSUI चे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी अर्जुन चपराना, प्रभारी अक्षय यादव यांचा महाराष्ट्राचा दौरा सुरू असून आज रोजी ते सोलापूर दौऱ्यावर आले असता काँग्रेस भवन सोलापूर येथे NSUI पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी NSUI चे सोलापूर शहर अध्यक्ष नागेश म्याकल यांनी स्वागत केले.

तसेच यावेळी नागेश म्याकल यांनी खासदार प्रणितीताई शिंदे, शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली NSUI विद्यार्थी संघटना चांगल्या प्रकारे काम करत आहे असे सांगितले.

यावेळी बोलताना अर्जुन चपराना म्हणाले की, NSUI प्रदेश कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असून संघटनेच्या मजबुतीसाठी आम्ही महाराष्ट्राचा दौरा करून विद्यार्थी आणि पदाधिकारी यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणी प्रामुख्याने शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, फी आणि परीक्षा फी वाढ, शैक्षणिक असमानता, शाळा बंद, शिक्षणाच्या खालावलेल्या दर्जा, पेपर लीक, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, रोजगार आणि सामाजिक स्वरूपाच्या असू शकतात ते सोडविण्यासाठी, त्याचप्रमाणे जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रम, व पक्षाने दिलेले कार्यक्रम राबविणे यासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी, लोकशाही वाचविण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी NSUI विद्यार्थी काँग्रेस मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
तसेच येणारी नविन NSUI कार्यकारणी विद्यार्थी काँग्रेस अधिक बळकट करेल. उर्जित अवस्था प्राप्त करेल ही अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मा. उपाध्यक्ष महाराष्ट्र NSUI सागर साळुंखे, मीडिया प्रमुख तिरूपती परकीपंडला, योगेश मार्गम, संजय गायकवाड, सचिव विजय बोगा, शुभम एक्कलदेली , सुभाष वाघमारे, चैत्यन घोडके, सुनिल सारंगी, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, विकेश बोलाबत्तीन, NSUI सोलापूर शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel