सोलापूर बातमी

विश्वास संपादन करून सोलापुरातील सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक….

सोलापुरातील एका सुपारी व्यापाराची लाखोंची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुसा कमालशाह मुर्शद, व्य 65 वर्ष, व्यवसाय सुपारी विक्रीचा व्यवसाय, राहणार 444, शास्वीनगर, बाळासाहेब ठाकरे हॉस्पीटलच्या पाठीमागे, सोलापुर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
इक्बाल महमद हुसेन शेख वय अंदाजे 38 वर्ष, राहणार 67 महात्मा फुले नगर, मजरेवाडी, सोलापुर याच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादीत म्हटले आहे की,
मुसा कमालशाह मुर्शद यांचा वडीलोपार्जित किरकोळ आणि होलसेल सुपारी विक्रीचा व्यवसाय आहे. सुपारी व्यवसायाचे दुकान हे शास्त्रीनगर मध्येच मौलाली चौक येथे एस एम ट्रेडर्स या नावाने आहे.

सन 2019 मध्ये इक्बाल महमद हुसेन शेख हा माझे एस एम ट्रेडर्स या दुकानातून सुपारी खरेदी
करण्यासाठी आला.

यावेळी इक्बाल शेख याने माझे दुकानातून 3 टन सुपारी रोखीने खरेदी केली. यानंतर इक्बाल शेख हा वारंवार माझे दुकानात सुपारी खरेदी करण्यासाठी येत आणि तो दिड क्विंटल आणि दोन क्विंटल अशी सुपारी रोखीने खरेदी करत होता यामुळे तो चांगल्या परिचयाचा झाला.

यानंतर इक्बाल महमंद हुसेन शेख हा फोन करून सुपारीची ऑर्डर देत आणि त्याचेकडे कामास असलेले नियाज शेख आणि सुलेमान शेख यांना माल नेण्यासाठी दुकानामध्ये पाठवित होता.

यानंतर दिनाक 03/04/2024 रोजी इक्बाल महमद हुसेन शेख हे दुकानावर आला आणि म्हणाला की, माझे एक पेयमेंट अडकलेले आहे. ते पेयमेंट आले की मी तुम्हांला एकदम रक्कम देतो. असे म्हणून उधारीवर माल दया असे विचारले.

इक्बाल शेख याने माझे दुकानामधुन सुमारे पाच वर्ष रोखीने माल नेल्याने तसेच त्याने यादरम्यान माझा विश्वास संपादन केलेने मी इक्बाल महमद हुसेन शेख यास काहीएक हरकत नाही मी तुला दोन महिने उधारीवर माल देतो पण मला दोन महिन्यानंतर माझ्या खरेदी केलेल्या मालाचे पैसे दे. असे सांगितले. यानंतर इक्बाल महमद हुसेन शेख याने ज्या ज्या वेळी फोन करुन सुपारीच्या मालाची ऑर्डर दिली त्या त्या वेळी मी नागपुर येथील व्यापारी इम्रान सुपारी ट्रेडर्स आणि उमर ट्रेडिंग कंपनी यांना फोन करुन मालाची ऑर्डर देवुन त्यांना मालाचे ऑनलाईन पैसे देवुन इक्बाल महमद हुसेन शेख याला त्याचे सांगणेवरुन त्याचे कडे कामाला असणारे नियाज शेख आणि सुलेमान शेख यांचे ताब्यात मी ऑर्डर केलेल्या सुपारीचा माल देत होतो.

यानंतर दिनांक 10/07/2024 रोजी अचानक इक्बाल महमद हुसेन शेख याचे मजरेवाडी येथील दुकानात गेलो असता मला इकबाल महमद हुसेन शेख याचा कामगार सुलेमान शेख याने सांगितले की, इक्बाल महंमद हुसेन शेख हा चार पाच दिवसापुर्वी लोकांचे पैसे घेवुन पळुन गेला आहे.

तेव्हा माझी खात्री झाली की, इकबाल महमद हुसेन शेख वय अंदाजे 38 वर्ष, राहणार 67 महात्मा फुले नगर, मजरेवाडी, सोलापुर याने माझा विश्वास संपादन करुन दिनांक 03/04/2024 ते दिनांक 30/06/2024 रोजीपर्यंत माझे शास्त्रीनगर, मौलाली चौक येथील एस एम ट्रेडर्स या सुपारीच्या दुकानातुन एकुण 13,42,927/- रुपये किंमतीचा सुपारीचा माल खरेदी करुन त्या मालाचे पैसे न देता पळुन जावुन माझे आर्थिक नुकसान केले.

इतकेच नव्हे तर याबाबत मुसा कमालशाह मुर्शद यांनी अधिक माहिती देताना सांगितले की त्यांचीच नव्हे तर अनेक दुकानदारांची अशीच फसवणूक झालेली आहे.
याबाबत अधिक माहिती मुसा कमालशाह मुर्शद  यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel