सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू
विषारी औषध प्राशन केलेल्या वृध्दाचा शासकीय रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला.रमेश जगदेव दोडमणी (वय ६०, रा. नागणसूर, ता. अक्कलकोट) असे मरण पावलेल्या वृध्दाचे नाव आहे. २० जून रोजी सकाळी राहत्या घरी अज्ञात कारणावरून रमेश दोडमणी यांनी पिकावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागल्याने भाऊ अनिल दोडमणी यांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना शुक्रवारी दोडमणी यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. हर्षल मेश्राम यांनी घोषित केले. याबाबत सिव्हील पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.