सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे बुधवारी सोलापुरात आगमन

खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत होणार प्रज्ञावंत मेळावा

सोलापूर : वीरशैव समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेत सन्मान करण्यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी काढलेल्या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचे बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी सोलापुरात आगमन होत आहे ,अशी माहिती संयोजक प्रा. गजानन धरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री क्षेत्र राजुर (अहमदपूर) भक्ती स्थळ येथून दि. 5 सप्टेंबर रोजी या वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेस प्रारंभ झाला आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भेटी देत दि. 21 सप्टेंबर 2024 रोजी शक्ती स्थळ मानले जाणारे श्री क्षेत्र मंगळवेढा येथे या यात्रेचा समारोप होणार आहे.
दरम्यान, बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी या यात्रेचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. सोलापुरात सकाळी 9 वाजता श्री सिद्धेश्वर देवस्थान येथे खा. गोपछडे हे दर्शन घेणार आहेत. सकाळी 9.30 वाजता यशोधरा हॉस्पिटलला ते भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता वीर तपस्वी शाळेस भेट देऊन तेथील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता ए. जी. इंजिनिअरिंग कॉलेज येथे भेट देणार आहेत. या ठिकाणी विद्यार्थी- प्राध्यापक यांच्याशी संवाद साधणार आहे. दुपारी 4 वाजता डॉ. खा. अजित गोपछडे यांच्या सोलापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 5 वाजता शिवस्मारक सभागृह येथे प्रज्ञावंतांचा मेळावा आयोजित केला आहे. यावेळी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान होणार आहे. रात्री 8 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विश्वस्त यांचा सन्मान होईल. रात्री 8.30 वाजता मानाचा कसबा गणपती येथे आरती होणार आहे. या सन्मान यात्रेत सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन संयोजन समितीचे प्रा. गजानन धरणे आणि समन्वयक डॉ. राजेश फडकुले यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस महादेव नावकर, चिदानंद मुस्तारे, सचिन कुलकर्णी, राजू विजापुरे , शशिकांत बिराजदार आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel