सोलापूर बातमी

व्हाट्सअप मेसेज मुळे मिळाल्या आज्जी..

व्हाट्सअप मेसेजमुळे सापडल्या दोन महिन्यापासून हरवलेल्या आज्जी..सोलापूर येथील जलकन्या भक्ती मधुकर जाधव यांनी एका व्हाट्सअँप मेसेज आधारे हरवलेल्या एका आज्जीना त्यांच्या नातलगापर्यंत पोहचवले आहे.सोलापूर शहर जवळील बाळे भागातील विनय क्लिनिक परिसरात गेले 72 तासापासून एक आज्जी निपचित बसून आहेत असा मेसेज मुंबई ग्रुपवरून सांगली जिल्ह्यातील आटपाडीच्या लोकांना दिसला.त्यात मेसेज पाठवणाऱ्याचे नाव,पत्ता,नंबर काहीही नव्हते.फक्त सोलापूर नाव वाचून आटपाडीहून संतोष सूर्यवंशी यांनी भक्तीताईना फोन करून शोध घेण्यास विनंती केली.तो ब्लँक मेसेज भक्तीताईंनी सोलापूरशी निगडीत अनेक ग्रुपवर प्रसारित करून मेसेज लिहिणाऱ्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.संभाजी ब्रिगेडचे श्रेयस माने यांच्यातर्फे मेसेज लिहिणारे बाळे भागातील दीपक करकी यांचा शोध लागला आणि आज्जी त्यांच्याजवळ असल्याचे कळले.यातूनच आटपाडी पोलीस ठाणेत मिसिंग केस दाखल झाल्याचे भक्तीताईंना कळले.त्यानुसार हालचाली करून,पूर्ण माहिती घेऊन खरसुंडी ता.आटपाडी जि.सांगली येथून या आज्जीच्या नातवाला सोलापूरला बोलावून घेऊन त्यांची कागदोपत्री ओळख पटवून,आज्जीशी सविस्तर बोलून समजूत काढून,आटपाडी पोलीस ठाणेला संपर्क करून पंढरपूर येथे दर्शनास येऊन दोन महिन्यापासून हरवलेल्या आणि सोलापूर येथे सापडलेल्या आज्जीना सुखरूप नातलगाच्या स्वाधीन केले.72 तासात बिस्किटे खाऊ घालून आज्जीची काळजी घेणारे,त्याबाबतीत मेसेज पाठवणारे दीपक करकी तसेच याकामी मदत केलेल्या प्रत्येकाचे भक्तीताईंनी आभार मानले आहेत.तसेच अनेक तीर्थक्षेत्र ठिकाणी जेष्ठ मंडळी हरवण्याचे अगर नातलगचं त्यांना वाऱ्यावर सोडून जाण्याचे प्रकार वाढले असल्याबाबत दुःख व्यक्त करून नागरिकांना सतर्क रहाण्याबाबत विनंती केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel