सोलापूर महानगरपालिकामहाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

शहरात प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सन 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्यात करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतासह सोलापूर शहरातही प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज दि.03/09/2024 पासून करणेत आला. या मोहिमेमध्ये सोलापूर शहरातील 18 वर्षावरील संमती दिलेल्या व टीबी वीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या 1,12,215 इतक्या प्रौढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येणार आहे. या मोहिमेत शहरातील प्रौढ व्यक्तीचे लसीकरण करुन व त्यांची शासनाच्या टीबी विन पोर्टल वर नोंद करण्यात येणार आहे व त्यांनंतर लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर सर्टिफीकेटसुध्दा देण्यात येणार आहे.
बीसीजी लस कोणाला द्यावी.
 मागील 5 वर्षातील क्षयरोगाचा औषधोपचार घेतलेल्या व्यक्ती (2019 पासून)
 औषधोपचार चालू असलेल्या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती (2021 पासून)
 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक
 मधुमेह असलेल्या व्यक्ती.
 धुम्रपान (सिगारेट, विडी, हुक्का इ.) ओढणाऱ्या किंवा यापुर्वी ओढत असलेल्या व्यक्ती
 ज्यांचा BMI (Body Mass Index) 18 पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती.
बीसीजी लस कोणाला द्यावयची नाही.
 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्ती.
 मागील तीन महिन्यात रक्त चढवून घेतलेल्या किंवा रक्तदान केलेल्या व्यक्ती.
 संमतीपत्रावर सही न दिलेल्या व्यक्ती.
 एचआयव्ही बाधीत किंवा पुर्व इतिहास असलेल्या व्यक्ती.
 गरोदर व स्तनदा माता.
बीसीजी लस लहान मुलांप्रमाणे प्रौढासाठी उपयुक्त आहे असे संशोधनावरून सिद्ध झाले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या मा.आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात नागरी आरोग्य केंद्र व विविध ठिकाणी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून लसीकरणाचे शुभारंभ आज करण्यात आली असून या कार्यक्रमास आरोग्याधिकारी डॉ.राखी माने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर व माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी माजी नगरसेवक विनायक विटकर आदी मान्यवर उपस्थित होते.या लसीकरणास उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून आज दि.03/08/2024 रोजी 1169 लाभार्थ्यांना लस देणे आली. सदर लसीकरण हे सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्र व तसेच विविध ठिकाणी सदरचे लसीकरण घेण्यात आले. हे लसीकरण मोहीम पुढील तीन महिने चालणार असून, या कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ व घ्यावा असे आवाहन उपायुक्त (आरोग्य) श्री.आशिष लोकरे  यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel