शैक्षणिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

सोलापूरच्या मुस्लिम समाजाच्यावतीने हिंदू गुणवंतांचा सत्कार म्हणजे एकोपा बंधुभावाचा आदर्श : एम. राज कुमार…

सोलापूर – कुल जमाते तंजिम आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षेत राज्यात द्वितीय आलेले परिस सुरेश गायकवाड, मुलींमध्ये राज्यात पहिली आलेल्या कु. वैष्णवी राम गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी अबूबकर नदाफ यांचा सत्कार केएमसी गार्डन येथे मौलाना ताहीर बेग यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर माजी प्राचार्य डॉ. एम.ए.दलाल, निवृत्त पोलिस उपअधीक्षक इक्बाल शेख, गुणवंतांचे पालक अस्मिता गायकवाड आणि मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, जेल रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी राऊत, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहर अध्यक्ष मतीन बागवान आदी उपस्थित होते.
सोलापूर शहर हे एकात्मतेचा संदेश देणार शहर आहे. मागील दोन वर्षांपासून पाहतोय की शहरात विविध धार्मिक एकोप्याचे कार्यक्रम मुस्लिम समाजाच्यावतीने राबविले जातात; यातीलच एक आजचा कार्यक्रम मुस्लिम बांधवांनी विचारातून कृतीतून दाखवून दिले की ज्ञानाला जशे जात धर्म पंथ नसतात म्हणून स्पर्धा परीक्षेतील यशस्वी गुणवंतांचा गौरव करण्यात आला. हा सत्कार म्हणजे हिंदू मुस्लिम एकोपा बंधुभावाचा आदर्श आहे याचा अभिमान वाटतो, असे मत पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माजी महापौर आरिफ शेख, युवराज पवार, याकुब मंगलगिरी, अलिम सय्यद, समिऊल्ला शेख, हासिब नदाफ, राजा बागवान, मुजीब सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, अजिज कोटी, लतिफ शाब्दी, वाहिद विजापूरे, हेमंत ढवळशंक, फय्याज बागवान, इम्तियाज कमिशनर , फारुख मटगे, इलियास आदिल, काशिम बेलिफ वजाहत अ. सत्तार, म. शफीक रचभरे, राजू हुंडेकरी, मुबिन शेख, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहोळकर, वाहिद तांबोळी, हारिस शेख, बाबा शेख, रुस्तुम शेख, सिकंदर नदाफ, इरफान शेख आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia