देश - विदेश
सोलापूर ब्रेकिंग : अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; तीन गावांचा संपर्क तुटला

अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव देशमुख येथे मुसळधार पावसामुळे ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने घोळसगाव, वागदरी आणि बोरगाव या तीन गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. परिसरातील नाले-ओढे तुडुंब भरून वाहत असून वाढत्या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, शेतांमध्ये पाणी साचल्याने तूर, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याची मागणी होत आहे.



