सोलापूर धार्मिकसोलापूर बातमी

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नव्या वास्तूचे वास्तू पूजन डाळिंबी आड इथे मोठ्या उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाले

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड इथ बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचे वास्तू पूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली सर्वप्रथम क्रेन च्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आले त्यानंतर सदरची मूर्ती नव्या वास्तूमध्ये ठेवण्यात आली. या नव्या वस्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचे देखील नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले राजन जाधव यांनी सांगितले, याप्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे गुरुजी, माजी उपमापोर तथा महामंडळाचे विश्वस्त पद्माकर काळे, विनोद भोसले, श्रीकांत डांगे, माऊली पवार, राजू सुपाते, सुभाष पवार, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, रवी मोहिते, मतीनं बागवान, तात्या वाघमोडे देविदास घुले, वैभव गंगणे
बसू कोळी प्रतापसिंह चौहान, उज्वल दीक्षित, विजय भुईटे, विजय पुकाळे, प्रीतम परदेशी, प्रकाश ननवरे, अनिकेत पिसे, सदाशिव पवार, संजय जाधव, जितू वाडेकर, विवेक फुटाणे, आदींसह शिवजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel