सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सलग १४ व्यांदा विक्रम खेलबुडे यांची बिनविरोध निवड!

सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक संचारचे ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची सलग १४ व्यांदा बिनविरोध निवड झाली. सरचिटणीसपदी एबीपी माझाचे प्रतिनिधी आफताब शेख, तर खजिनदारपदी दैनिक दिव्य मराठीचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांची निवड करण्यात आली. संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२६-२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्रारंभी मावळते सरचिटणीस सागर सुरवसे यांनी मागील वर्षाचा इतिवृत्तांत सादर केला, तर मावळते खजिनदार किरण बनसोडे यांनी जमाखर्चाचा तपशील सभेसमोर मांडला. सभेने दोन्ही अहवालांना एकमताने मान्यता दिल्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजयकुमार राजापूरे, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोष सिरसट यांनी काम पाहिले.
नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे : उपाध्यक्ष – अविनाश गायकवाड, नितीन पात्रे, अरविंद मोटे, संगमेश जेऊरे, रुपेश हेळवे
चिटणीस – अमोल व्यवहारे, रतन (आप्पा) बनसोडे, प्रीतम पंडित लखन अदाटे
सहचिटणीस – धनंजय मोरे, विनोद हुमनाबादकर, रोहित थळवे
कार्यकारणी सदस्य :- विजयकुमार राजापूरे, अरुण रोटे, शीतलकुमार कांबळे, समीर कार्यकर्ते, दीपक दुपारगुडे, रवींद्र दंतकाळे, राजेश कुलकर्णी, रवी ढोबळे, श्रीनिवास मावनूर, गौतम गायकवाड, विक्रांत कालेकर, पिंटू विभुते, सचिन जाधव, यशवंत गुरव, नितीन कटके, अंबादास पोळ, मुजम्मील शाहनूरकर, सुदर्शन भालेराव, सागर इप्पलपल्ली, आरती कुसेकर
सल्लागार :- प्रशांत जोशी, शंकर जाधव, हेमंत चौधरी
मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान
—
या निवडीनंतर दैनिक सकाळचे संपादक सिद्धाराम पाटील, दैनिक तरुण भारत संवादचे संपादक विजयकुमार देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार नारायण कारंजकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिखर पहारिया फाउंडेशन, महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक मनीष केत यांच्या अभिनंदनाचा ठराव
—
पत्रकार संघाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी सहकार्य केल्याबद्दल शिखर पहारिया फाउंडेशनच्या अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. तसेच ज्येष्ठ पत्रकार मनीष केत यांची महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आणि संघाच्या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या अभिनंदनाचाही ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.



