शेतकरी कुटुंबातील अनिल पाटील जिल्हा व सत्र न्यायालयात सोलापूर येथे लिपिक पदावर रुजू…

तडवळ ग्रामस्थांचा कौतुकाचा वर्षाव
सोलापूर, दि.२८
शेतकरी कुटंबातील अनिल कामगोंडा पाटील राहणार तडवळ यांनी सोलापूर न्यायालयात लिपिक पदाला गवसनी घातली आहे. महत्वाचे म्हणजे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी दिवस रात्र शाळेत अभ्यास करून हे पद प्राप्त केले आहे. पाटील यांचे प्राथमिक शिक्षण श्री जय शंकर प्रशाला तडवळ तालुका अक्कलकोट येथे झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेज येथे रात्र शिक्षण करत टंकलेखक व लघुलेखक परीक्षा उत्तीर्ण केली.
दरम्यान, पुणे येथील वकील पी.नारायण यांच्याकडे चार वर्ष नोकरी केली. त्यावेळी पाटील यांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. कष्ट व अभ्यास यात सातत्य राखल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाची ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले. जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर येथे लिपिकपदी रुजू झाल्यानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तडवळसह अक्कलकोट तालुक्यातील ग्रामस्थांनी त्यांचे सत्कार करत अभिनंदन केले आहे. त्यांच्या यशामध्ये त्यांचे काका शिवाजी पाटील व दिलीप पाटील यांचे मोठे योगदान लाभले आहे.