सोलापूर बातमीमनोरंजनमहाराष्ट्र

‘श्री गणेशा’ २० डिसेंबरला होतोय सर्वत्र प्रदर्शित…

मनोरंजनाची संगीतमय सफर घडवणारा...

सोलापूर : कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात ‘श्री गणेशा’ म्हणून केली जाते. हल्ली रसिकांमध्येही अशाच एका ‘श्री गणेशा’ ची जोरदार चर्चा आहे. आगामी मराठी चित्रपट ‘श्री गणेशा’ प्रेक्षकांना मनोरंजनाच्या अनोख्या सफरीवर घेऊन जात आहे. मराठी फॅमिली एन्टरटेनर असलेला ‘श्री गणेशा’ हा मराठीतील एक धमाल रोड मुव्ही आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे,

‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या ‘श्री गणेशा’ या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते, तर रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

आजवर नेहमीच आशयघन चित्रपटांना विनोदाची किनार जोडत परिपूर्ण मनोरंजनाद्वारे जनमाणसांपर्यंत मोलाचा संदेश पोहोचविणारे दिग्दर्शक मिलिंद कवडे ‘श्री गणेशा’ च्या निमित्ताने लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायम चर्चेत आहे. मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब ही दिग्दर्शक-अभिनेत्याची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली आहे.

त्यामुळे हा चित्रपट म्हणजे मौज, मस्ती आणि धमाल अशी रोलर कोस्टर राईडच ठरणार आहे. प्रथमेशने यापूर्वी साकारलेल्या दगडू आणि टकाटक मधील गण्या नंतर या चित्रपटात त्याच्या रूपातील टिकल्याची कमाल पाहायला मिळणार आहे.या चित्रपटात प्रथमेशसोबत मेघा शिंदे ही नवीन नायिका असल्याने नव्या जोडीची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आकर्षित करणार आहे.

प्रथमेशच्या सोबतीला शशांक शेंडे हे कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यास सक्षम असलेले अभिनेते आहेत. त्यांनी यात चक्क दाढी-मिशी चकाचक करून भाऊसाहेब पाटील हे कॅरेक्टर साकारलं आहे.भाई वेंगुर्लेकरच्या रूपात संजय नार्वेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज आहे.

या चित्रपटातील गाणी अगोदरच लोकप्रिय झाली आहेत.’आली मधुबाला…’ हे गाणे चांगलेच पॅाप्युलर झाले असून, टायटल ट्रॅकही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. हा एक रोड मुव्ही असल्याने यातील कमालीची नेत्रसुखद लोकेशन्स प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणार, हेही जमेच्या बाजू आहेत.

या चित्रपटाबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, ‘श्री गणेशा’च्या रूपात आम्ही आजवर मराठीत कधीही न सादर केलेले कथानक रोड मुव्हीच्या माध्यमातून आणले आहे. यात केवळ विनोद नसून, इमोशन्सही आहेत. यातील नातेसंबंधांची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे. यासाठी प्रत्येक कलाकाराने आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. प्रथमेश आणि शेंडे यांच्यातील अफलातून टायमिंग प्रेक्षकांना चित्रपट पाहताना अनुभवायला मिळेल.

अभिनेते संजय नार्वेकर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केलेली फटकेबाजी आणि नाट्यमय वळणांची पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवेल.’श्री गणेशा’ च्या माध्यमातून आपल्या टिमने एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजक चित्रपट रसिकांसमोर सादर केला असल्याचेही कवडे म्हणाले. दिग्दर्शनासोबत चित्रपटाची कथासुद्धा मिलिंद कवडे यांनीच लिहिली आहे. याखेरीज त्यांनी संजय नवगिरे यांच्या सोबत मिळून पटकथालेखनही केले आहे. संजय नवगिरे यांनी संवादलेखन केले आहे.

गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केले असून, संगीतकार वरुण लिखते यांचा त्यावर स्वरसाज आहे. पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांनी दिले आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गुरु पाटील यांनी संकलन केले आहे. राहुल ठोंबरे यांचं नृत्य दिग्दर्शन,तर सुमित पाटील कला दिग्दर्शन केलं आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता, तर विनोद शिंदे सहदिग्दर्शक आहेत.

प्रमुख उपस्थिती:
निर्माते : संजय भोसले
दिग्दर्शक : मिलिंद कवडे
कलाकार : शशांक शेंडे, प्रथमेश परब, मेघा शिंदे आणि मानसी शिंदे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel