संजय कुमार घोडके सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार…
संजय कुमार घोडके, वय ३६ वर्षे, रा. केशव नगर झोपडपट्टी, मौलाली चौक, दक्षिण सदर बझार, सोलापूर याचेविरुध्द सन २०२४ या कालावधीमध्ये, साथीदारासह नागरीकांना शिवीगाळ व मारहाण करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द सदर बझार पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. २१६७/२०२४ दि.२७/०८/२०२४ अन्वये, इसम नामे, संजय कुमार घोडके, वय-३६ वर्षे, रा. केशव नगर झोपडपट्टी, मौलाली चौक, दक्षिण सदर बझार, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.२९/०८/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे…