महाराष्ट्रराजकीय

सोलापुरात संजय राऊत यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांनी अत्याचारग्रस्त मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो ट्विट केला होता. अजूनही तो फोटो त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊत यांच्या ट्वीटनंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांनी 18 मार्चला आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अत्याचरग्रस्त मुलीचा फोटो शेअर केलेला आहे. या आक्षेपार्ह फोटोला ट्विटरनेही सेन्सिटीव्ह कंटेटमध्ये धरले आहे. अत्याचारपीडित मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेतला फोटो त्यांनी शेअर केला आहे.

काय आहे ट्विटमध्ये?

संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे. यात त्यांनी म्हटले आहे, देवेंद्रजी. हे चित्र बार्शीतले आहे. मुलगी तुमच्या कुटुंबातील नाही म्हणून तिचे रक्त वाया जाऊ देऊ नका. भाजपा पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला आहे. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत ? 5 मार्चला हल्ला झाला. आरोपी मोकाट आहेत.

वार-पलटवार

संजय राऊत यांच्या ट्विटवर आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी म्हटले आहे, प्रिय, संजुभाऊ, 6 मार्च रोजी झालेल्या या घटनेतील दोन्ही आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक करण्यात आली. याशिवाय, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन अधिकारी आणि दोन हेडकॉन्स्टेबल यांना 8 मार्च रोजीच निलंबित करण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच, बार्शी पोलिसांनी सदर युवतीला वैद्यकीय मदत मिळवून दिली. तिला सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि आता तिच्या प्रकृतीत बर्‍यापैकी सुधारणा झाली आहे. हे भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आहे, आरोपींचा बचाव करणारे महाविकास आघाडीचे नाही!

नेमकी काय आहे घटना?

बार्शी तालुक्यातील बालेवाडी येथे 5 मार्च रोजी ही घटना आहे. पारधी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संध्याकाळी शिकवणी झाल्यानंतर घरी निघाली होती. यावेळी रेल्वे गेटजवळ दोन तरुणांनी अडवून तिच्यावर बलात्कार केला. त्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीने पालकांसह बार्शी पोलिसात तक्रार केली. त्या मुलीच्या तक्रारीमुळे आरोपींनी संध्याकाळी जाऊन तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. यात ती मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहे. 5 मार्च रोजी रात्री घटलेल्या या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel