संपसोलापूर विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राची पहिली बैठक न्न!
विविध उपक्रमातून होणार लोकशाहीरांच्या साहित्यावर मंथन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र कृती समितीची पहिली बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत वर्षभर विद्यापीठात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांविषयी चर्चा झाली. कृती आराखडा संदर्भातही समिती सदस्यांनी विविध सूचना यावेळी मांडल्या…
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र समितीचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉ. परमेश्वर हाटकर, डॉ. किशोर जोगदंड, डॉ. धनंजय साठे, डॉ. भगवान नाईकनवरे आदी उपस्थित होते. समन्वयक म्हणून डॉ. ए. आर. शिंदे यांनी काम पाहिले.
यावेळी समितीचे सदस्य राजाभाऊ सरवदे यांनी विद्यापीठात स्थापन झालेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्रासाठी स्वतंत्र जागा, कार्यालय तसेच ग्रंथालय निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर वर्षभर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा जागर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्या संदर्भात चर्चा झाली. याचबरोबर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राना भेती देऊन त्या संदर्भात माहिती घेण्यासंदर्भात ही सदस्यानी चर्चा केली. व्याख्यान, शाहिरांचा मेळावा, पोवाडे, चर्चासत्र व साहित्यिकांचा सन्मान असे विविध उपक्रम घेण्यासंदर्भात देखील यावेळी चर्चा झाली.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र कृती समितीची पहिली बैठक पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ. दिगंबर झोंबाडे, सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉ. ए. आर. शिंदे व अन्य.