समता सैनिक दलाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना…

सोलापूर दि. समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आणि शाक्य संघाच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम आणि शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे जेष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर , महासचिव अनिल जगझाप, अंगद जेटीथोर ,विठ्ठल थोरे, रत्नदीप कांबळे, प्रमोद जाधव, विनोद जाधव संभाजी तळभंडारे ,मुकुंद चंदनशिवे ,चंद्रकांत कोळेकर, ज्ञानेश्वर प्रक्षाळे यांच्यासह शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके ,शांताराम वाघमारे,चोकोबा कांबळे ,वेंकटेश सोनवणे ,गोपीचंद कांबळे ,हवलदार सोनवणे ,शशिकांत बाबरे ,तसेच महिला ब्रिगेडच्या सुमित्रा केरू जाधव गाडे, बाबरे ताई इत्यादी महिला सैनिक उपस्थित होते.