सविता बनसोडे यांना सोलापूर विद्यापीठाची विधी अभ्यासक्रमाची पीएचडी पदवी प्राप्त
सोलापूर येथील दयानंद विधी महाविद्यालयाच्या सविता शशिकांत बनसोडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची विधी या अभ्यासक्रमाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
“सेक्स सिलेक्टिव्ह अबोरशन अंडर प्री कन्सेपशन अँड प्री-नाटल डायग्नोस्टिक टेक्निक्स ( पीसीपीएनडीटी) ऍक्ट विथ स्पेशल रेफरन्स टू स्टेट ऑफ महाराष्ट्र” म्हणजेच गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत लिंग निवडक गर्भपात महाराष्ट्र राज्याच्या विशेष संदर्भात हा त्यांचा संशोधनाचा विषय होता. त्यांना बार्शी येथील राजर्षी शाहू विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. वाय. सोनकांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे दयानंद विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोनाली गायकवाड यांनी अभिनंदन केले.
येथील हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयाचे निवृत्त कार्यालय अधीक्षक शशिकांत बनसोडे यांच्या त्या कन्या आहेत. वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्यांचे चिरंजीव प्रा. डॉ. शीलरत्न बनसोडे यांनीही नुकतीच अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे.