सातारा येथील मॉल मध्ये गोळीबार !
पुणे बंगलोर महामार्गावर साताऱ्यात शेंद्रे येथील चप्पलच्या मॉलमध्ये ग्राहकाकडून चुकून गोळीबार होऊन एक कामगार जखमी झाला.पुणे बंगलोर महामार्गावर साताऱ्यात शेंद्रे गावच्या हद्दीत महामार्गालगत असलेल्या चप्पलच्या मॉलमध्ये सायंकाळी ग्राहकाकडून बंदुकीतून चुकून गोळी सुटून कामगार जखमी झाल्याची घटना घडली. उलफिद युसूफ खान असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमी कामगाराला साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रियांका शू मॉल मध्ये नगर जिल्ह्यातील अभय आवटे हे ग्राहक लायसन-असलेल्या रिव्हॉल्वरसाठी लेदरचा कव्हर घेण्यासाठी गेला होता. त्या वेळेस त्याच्या हातून चुकून ट्रिगर दाबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटून कामगारांच्या मांडीला लागली आहे. दोन दिवसांपूर्वी पाटण तालुक्यात झालेली घटना ताजी असतानाच पुन्हा जिल्ह्यात गोळीबार झाल्याने या अचानक घडलेल्या घटनेने जिल्हा पुन्हा हादरला. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले असून घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.याबाबत माहिती तालुका पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली आहे.