सासऱ्याने सुनेची डोक्यात घातली वीट… काय आहे प्रकरण पहा!
दिल्लीत एका व्यक्तीने आपल्या सुनेच्या डोक्यात वीट घालून तिचे डोके फोडले. प्रेमनगर भागात मंगळवारी ही घटना घडली. ती तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. व्हिडिओत काजल नामक महिला गल्लीत फिरताना दिसून येत आहे. तेव्हा पाठीमागून आलेल्या सासऱ्यासोबत तिचा शाब्दिक वाद होतो. त्यानंतर हा व्यक्ती तिच्या थेट वीट घालतो.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला जमिनीवर कोसळते. त्यानंतर ती जिवाच्या आकांताने धावताना दिसते. मारहाणीचाी हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
जवळ बसलेला व्यक्ती मूकदर्शक
सासरा सुनेला मारहाण करत होता, तेव्हा तिथे एक व्यक्ती बसला होता. त्याने या प्रकरणी कोणताही हस्तक्षेप केला नाही. तो महिलेला होणारी मारहाण शांतपणे पाहत होता. पोलिसांनी या प्रकरणी सून काजलला रुग्णालयात दाखल केले. तिथे तिच्या डोक्याला तब्बल 17 टाके पडले.
सूनेच्या नोकरी करण्यावर होता नाराज
यासंबंधीच्या वृत्तानुसार, काजलचे वडील सत्यप्रकाश यांनी सांगितले की त्यांच्या मुलीचे लग्न प्रवीणशी झाले होते. तो सिव्हिल डिफेन्समध्ये नोकरीस आहे. त्यांच्या मुलीचीही नोकरी करण्याची इच्छा होती. मंगळवारी तिला मुलाखतीसाठी जायचे होते. पण काजलच्या सासऱ्याचा त्याला विरोध होता. यामुळे त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. काजलने सासऱ्याच्या विरोध डावलत नोकरी करण्यावर ठाम होती. यामुळे संतप्त झालेल्या सासऱ्याने तिच्यावर हल्ला केला.