राजकीयमहाराष्ट्र
शरद पवारांना मोठा धक्का; या नेत्याचा ‘यु टर्न’, महायुतीसोबत राहण्याचा निर्णय

मुंबई ( प्रतिनिधि):-राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये जानकर यांना लोकसभेची एक जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे महादेव जानकर यांनी आज ‘यू टर्न’ घेत आपण महायुतीसोबत राहणार असल्याचे सांगितले आहे. जानकर यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक झाली. त्या बैठकीत जानकर यांच्या पक्षाला महायुतीमध्ये लोकसभेची एक जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही जागा कोणती असेल याची लवकरच घोषणा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.