सोलापुरातील अवैध धंदे बंद करा – वैभव गंगणे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी अशी ओळख असून या हुतात्म्यांच्या नगरीत १८ पगड जाती – धर्माचे विविध लोक समाजात आदर्श निर्माण करत गुण्या गोविंदाने आनंदात राहतात. शहराचा मुख्य केंद्रीबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर रविवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते. तसेच जवळच बस स्थानक असल्याने अनेक ठिकाणां हून सोलापुरात दाखल होणाऱ्याची संख्या जवळपास हजार हून अधिक आहे.
तमाम शिवप्रेमीचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी संपूर्ण चौकाला विळखा घातले आहे. याला सर्वस्वी जबाबदार येथील अवैध धंद्याचे लॉज असून हे लॉज वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देऊन सोलापूरची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहे. त्यामुळे हे लॉज त्वरित बंद होणे गरजेचे आहेत. व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा ही बंदोबस्त करून पवित्र स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला या विळख्यातून मुक्त करावे. या परिसरात अथवा परिसरा नजिक छुप्या पद्धतीने अवैध जुगार अड्डे व मटका धंदा तेजीत सुरू असून तेही बंद करण्यात यावेत. याबाबतचे लेखी निवेदन पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, सुरेश मसळी, धनंजय जाधव, किरण अवताडे आदींसह युवक उपस्थित होते.