सोलापूर बातमीSolapur court matterन्यायालय निर्णयसोलापूर क्राईम

सोलापुरातील ‘ त्या ‘ बलात्कार प्रकरणातील आरोपीचा जामीन मंजूर…

विवाहित मुली सोबत ओळख करून घेऊन तिला दिनांक 4 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 24 पर्यंत सिकंदराबाद राज्य तेलंगणा येथे घेऊन जाऊन लॉजवर तिच्यावर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेला गंगाराम प्रकाश कोळी व 31 रा -साईबाबा चौक सोलापूर यास जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे साहेब यांनी जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी की, पिडीतही सोलापूर येथे तिच्या बहिणीकडे राहात असताना तिचे ओळख आरोपीशी सप्टेंबर 2024 मध्ये झाली दोघांची मैत्री होऊन प्रेमात रुपांतर झाले .आरोपी हा पिढीतला आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ असे म्हणून तिला चार ऑक्टोबर 24 रोजी सिकंदराबाद येथे घेऊन जाऊन तीच्यावर दुष्कर्म करून तिला ११ ऑक्टोबर 2024 रोजी सोलापूर येथे आणून सोडले. दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी पिडीतेचे वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग दाखल केला. पीडितेच्या जबाबवरून तिच्या पती व वरील आरोपीविरुद्ध दुष्कर्म व पोक्सोचा कलम वाढविण्यात आले. सदर गुन्ह्यात आरोपीस पोलिसांनी 15 नोव्हेंबर 24 रोजी अटक करून त्याच्याविरुद्ध दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केला. सदर गुन्ह्याचा तपास स. पो.नि.नीलम घोरपडे यांनी केला. आरोपींनी जामीनासाठी अर्ज दाखल केला असता, अर्जाच्या वेळी पीडितही १६ वर्षापेक्षा जास्त वय असून ,तिने तिच्या मर्जीने आरोपी बरोबर पळून गेली असल्याने आरोपीस जामीन मंजूर करण्यात यावे. यात सरकार पक्षातर्फे एडवोकेट दत्ता पवार यांनी तर आरोपीतर्फे एडवोकेट सचिन एच इंगळगी यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel