सोलापुरात पती-पत्नीचा दीड कोटींचा महाघोटाळा ; गुन्हा दाखल!

सोलापूरात दीड कोटींचा घोटाळा उघड! फायनान्स कंपनीच्या पती-पत्नी मालकानेच केला अपहार, कर्मचाऱ्यांना धमकावून बनावट व्हाऊचर, रक्कम लाटून FD मध्ये गुंतवणूक; जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूरातील प्रसिद्ध रविसागर फायनान्स कंपनीत तब्बल १ कोटी ५८ लाख ६७ हजार रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. कंपनीच्या भागीदारांनीच विश्वासघात करत बनावट कागदपत्रे, खोटे व्हाऊचर तयार करून कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग करून नंतर रोख स्वरूपात काढून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये निष्पन्न झाले आहे.
पोलीस ठाणे – जोडभावी पेठ पोलीस ठाणे
गु.र.नं. व कलम – ७६५/२०२६ भा.न्याय सं.क ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३३९, ३४०(२), ३(५) प्रमाणे
गु.घ.ता.वेळ/ठि. – दि. २६/०७/२०१६ ते दि. २१/०७/२०२६ रोजी रविसागर फायनान्स अँन्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन रजिस्टर कंपनी ९३७ राजयोग हाईट फलटन गल्ली सोलापूर
गु.दा.ता.वेळ – दि. ०८/१०/२०२६ रोजी १३.११ वा.
फिर्यादीचे नाव – संजय भिमाशंकर थोबडे, वय-६५ वर्षे, रा-७०१ उत्तर कसबा सोलापूर
आरोपीचे नाव – १) अर्जुन दशरथसा आरसिद २) सौ शशिकला अर्जुन आरसिद रा-३९७ राजयोग हाईट फलटन गल्ली सोलापूर
फसवणूक रक्कम – १,५८,६७,४०१/- रुपये
हकीकत अशी की,
यातील रविसागर ऑटो फायनान्स रजिस्टर भागीदार फर्म, २) रविसागर ऑटो फायनान्स प्रा.लि कंपनी, ३) रविसागर फायनान्स अँन्ड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन रजिस्टर भागीदार फर्मचे सर्व भागीदार व संचालक यांना बोलावून घेवून त्यांचे समक्ष यातील आरोपीत मजकूर यांनी दि. २६/०७/२०१६ ते दि. २१/०७/२०२६ रोजी पर्यंत कंपनीमध्ये केलेल्या अपहार व फसवणुकीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी संशयरित्या उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने वरील तिन्ही फर्मचे श्री नागेश कणकी (सी.ए) यांचेकडून फॉरेन्सीक ऑडीट करून अहवाल प्राप्त करून घेतला त्यामध्ये वरील आरोपीत मजकूर यांनी गैरव्यवहार केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपीत यांचेकडे आम्ही विश्वासाने कंपनीचा व्यवसाय सांभाळण्याकरीता दिले असताना त्यांनी आपसात संगनमत करून त्यांच्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादीचा विश्वासघात करण्याच्या उद्देशाने कंपनीतील श्रीपाद बोध्दुल व ज्योती आलमेकर यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देवून कंपनीतील वर नमुद प्रमाणे खातेदाराच्या खात्यातील रक्कमा त्यांचे परवानगीविना कपटाने त्यांचे नावाचे खोटे व बनावट व्हाऊचर तयार करून बनावट सह्या करून त्या रक्कमा कंपनीतील कामगाराच्या बँक खात्यात वर्ग करून घेवून नंतर त्या रक्कमा त्यांना बँक खात्यातून रोख स्वरूपात काढावयास सांगून त्या रक्कमा स्वतःच्या फायद्यासाठी रोख स्वरूपात स्विकारून एकूण १,५८,६७,४०१/- अप्रामाणिकपणे अपहार करून त्यापैकी काही रक्कम त्यांनी आमच्या वरील कंपनीमध्ये मुदत ठेव मध्ये गुंतवणूक केलेली आहे.



