सोलापूर बातमी

सोलापुरातील नूतन आरोग्य अधिकारी डॉ राखी माने यांचा सत्कार….

सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे नूतन कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी डॉक्टर सौ.राखी माने हे अतिशय चांगल्या पद्धतीने आपले कर्तव्य बजावत असल्याने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने मॅडम यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या दवाखान्यांना ताबडतोब भेटी देऊन आरोग्य विभागाचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असला पाहिजे असे आदेश अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. व कर्मचाऱ्यांना चांगली शिस्त लावण्याचे प्रयत्न करत असल्याने अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या पाठीमागे ट्रेड युनियनचे पदाधिकारी नेहमी उभे राहिलेले आहेत असल्याच शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारीची गरज महापालिकेला असल्याचे ठामपणे सांगितले व आरोग्य अधिकारी मॅडम यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य अधिकारी यांनी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळाचे आभार मानून अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी तात्कालीन आरोग्य अधिकारी कुलकर्णी मॅडम व सहाय्यक आरोग्य अधिकारी बोराडे साहेब यांची उपस्थिती होती.
यावेळी ट्रेड युनियनचे कार्याध्यक्ष योहान कानेपागुल यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
यावेळी ट्रेड युनियनचे पदाधिकारी व महिला सदस्य कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel