सोलापूर बातमीsolapur mim newsमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024

सोलापुरातील मुस्लिम मतांमुळे प्रणिती शिंदेचा विजय;एमआयएम नेत्याने केला दावा

सोलापुरातील मुस्लिम मतदारांनी भरघोस मतदान केलं होतं

सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदेंचा जवळपास ७४ हजार मतांनी विजय झाला आहे.मतमोजणीच्या निकाला नंतर सोलापुरात विविध नेत्यांत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.सोलापुरातील एमआयएम नेते व माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी माध्यमांसमोर येऊन बोलताना माहिती दिली आहे,मुस्लिम समाजातील मतदारांनी पहिल्यांदाच रिकोर्डब्रेक मतदान केले आहे.7 मे मतदाना दिवशी मुस्लिम महिलांच्या रांगा पहावयास मिळाल्या होत्या.4 जून रोजी निकाल लागल्यानंतर सोलापुरात सोलापूर शहर मध्य,दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघातुन प्रणिती शिंदेंना लीड मिळाली.सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे.म्हणून महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पराभूत करू शकले आहे,असे एमआयएम नेत्याने दावा केला आहे.

*सोलापूर शहर मध्य मधून 709 मतांची लीड-
सोलापूर शहरमध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदें तीन वेळा आमदार राहिल्या आहेत.मध्य विधानसभा मतदारसंघ हा मुस्लिम मतदारांचा गड मानला जातो.बेगम पेठ,बाशा पेठ,शनिवार पेठ,विजापूर वेस,सिद्धेश्वर पेठ,मुस्लिम पाछा पेठ,दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात नई जिंदगी,सिद्धेश्वर नगर,सहारा नगर सह आदी भागात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे मुस्लिम मतदारांच्या जोरावरच तीन वेळा आमदार झाल्या आहेत असं एमआयएम नेते रियाज खरादी यांनी दावा केला आहे.

*खासदारकी साठी एमआयएम व मुस्लिम समाजाने मदत केली-
सोलापूर लोकसभा निवडणूकीत मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने प्रणिती शिंदेंना पाठिंबा दिला आहे.नव खासदार प्रणिती शिंदेंनी भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत मुस्लिम समाजाचा आमदार व्हावा अशी सोलापूरकरांची इच्छा आहे.यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने उमेदवार दिला नाही,त्यामुळेच प्रणिती शिंदें निवडून आल्या.एमआयएमने सोलापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार दिला असता तर जवळजवळ एक लाख मत एमआयएम उमेदवाराला मिळाले असते.भविष्यात एमआयएमच्या उमेदवाराला आमदार होण्यासाठी प्रणिती शिंदे मदत करतील असा विश्वास एमआयएमचे स्थानिक नेते रियाज खरादी यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel