राजकीय
सोलापुरातील समर्थ बँकेवर आर बी आयचे निर्बंध;ठेवदारांचा आक्रोश

सोलापुरातील समर्थ बँकेवर आर बी आयचे निर्बंध;ठेवदारांचा आक्रोश
सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध घातल्याने हजारो ठेवदारांच्या रकमा अडकल्या आहेत . मागील तीन महिन्यांपासून समर्थ सहकारी बँकेवर आर बी आय बँक अनेक निर्बंध घातले आहेत. बुधवार ७ ऑक्टोबर पासून समर्थ सहकारी बँकेचे सर्व कामकाज ठप्प झाले आहेत. पै पै करून जमा केलेली ठेवीदारांची रक्कम बँकेत अडकून पडली आहे.कोट्यावधी रुपयांच्या रकमा बँक देण्याs असमर्थ झाल्याने ठेवीदारांनी गुरुवारी सकाळ पासून सोलापूर शहरातील विविध शाखासमोर बँकेचे ग्राहक गोंधळ करताना निदर्शनास आले.समर्थ सहकारी बँकेचे अधिकारी ग्राहकांना समाधान कारक उत्तर न दिल्याने बँक कर्मचारी आणि बँक ग्राहकात बाचाबाची झाली . समर्थ बँके समोर जास्त गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता



