क्राईमन्यायालय निर्णयसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरातून अजय जाधव यावर MPDA खाली कारवाई

शस्त्र घेऊन परिसरात दहशत करणारा इसम अजय रघुनाथ जाधव हा एमपीडीए अन्वये स्थानबध्द

सोलापूर शहरातील सदर बझार पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, अजय रघुनाथ जाधव, वय ४० वर्षे, रा. शामा नगर झोपडपट्टी, सोलापूर हा मागील काही वर्षापासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन बेकयदेशीर जमाव जमविणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, स्वच्छेने घातक शस्त्राने दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न करणे आणि प्रतिबंधक आदेशाचा भंग करणे आणि धमकी देणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने, अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अश्या प्रकारे गंभीर स्वरुपाचे एकुण ०४ गुन्हे सोलापुर शहरात दाखल आहेत. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अजय रघुनाथ जाधव याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापुर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असुन, त्याचे विरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत.

अजय रघुनाथ जाधव यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये क. ११०(ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार व सन २०२४ मध्ये क.५६ (१) (अ) (व) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालु ठेवली. त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी, मा.एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापुर शहर यांनी, दि.०२/०५/२०२४ रोजी त्याचे विरुध्द एमपीडीए अधिनियम, १९८१ चे कलम ३ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, स्थानबध्द आदेशाची बजावणी करुन, येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही, मा. एम. राज कुमार, मा. पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली, मा.डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा), मा. विजय कबाडे पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे, अजय परमार, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०२, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, अजित लकडे, वपोनि, सदर बझार पोलीस ठाणे, पोउपनि/विशेंद्रसिंग बायस गुन्हे शाखा, एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ-/८३३ विनायक संगमवार, पोहेकॉ/१२५४ सुदीप शिंदे, पोशि/१९१६ अक्षय जाधव, पोशि/६५४ विशाल नवले यांनी केली आहे

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel