सोलापुरातून ३० वर्षीय महिला बेपत्ता पोलिसांकडून शोध सुरू..!

सोलापूर, दि. ०५ सप्टेंबर -* तोंडा देगाव येथील बसवेश्वर नगरमध्ये राहणारी ३० वर्षीय महिला घरातून कोणालाही न सांगता निघून गेल्याने बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात बेपत्ता नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती –
बेपत्ता महिलेचे नाव *जिजाबाई तुकाराम राठोड, वय ३० वर्षे, रा. बसवेश्वर नगर, तोंडा-देगाव, ता. उत्तर सोलापूर* असे आहे.
दि. ०५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्या राहत्या घरातून निघून गेल्या. नातेवाईकांनी सोलापूर शहर व परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे पती तुकाराम कुरसिंग राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलगरवस्ती पोलीस ठाण्यात *बेपत्ता क्र. ४०/२०२६* दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता महिलेचे वर्णन –
रंग :* गोरा, *उंची :* ५.५ फूट, *बांधा :* मध्यम
शिक्षण :* १२ वी, *भाषा :* मराठी, हिंदी, लमाणी
अंगातील कपडे :* हिरवा-राखाडी रंगाचा सलवार कुर्ता
विशेष खुणा :* कानात सोन्याचे फूल, नाकात सोन्याची नथ, पायात चांदीचे कडे व पैंजण
या महिलेबाबत कोणाला काहीही माहिती मिळाल्यास *सलगरवस्ती पोलीस ठाणे* यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे..!



