बापरे…महिला पोलिसाची आत्महत्या, तू काळी आहे म्हणत केलं पतीने छळ, गुन्हा दाखल..!

महाराष्ट्रातील पारधी समाजातील मुलींसाठी प्रेरणास्थान ठरलेल्या बारामती तालुक्यातील ३१ वर्षीय महिला पोलिसाच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पतीकडून कथित मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याच्या आरोपांनंतर डोबिवली पश्चिममधील देवीचा पाडा परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१, रा. करंजे, ता. बारामती) असे मृत महिला पोलिसाचे नाव आहे. तिचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर ती पत्नीसोबत डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होती.
पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पत्नीच्या सावळ्या वर्णावरून पतीकडून अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आहे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार वाद घातले जात होते तसेच मारहाण केली जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.



