महाराष्ट्र

सोलापुरात अवैध दारू विक्री खुलेआम!

सोलापूर : ‘सोलापूर जिल्ह्याला  हातभट्टीमुक्त जिल्हा’ करण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून ‘ऑपरेशन परिवर्तन’ राबविले जात आहे. तांड्यावरील हातभट्टी निर्मिती व विक्री थांबली तथा खूपच कमी झाल्याचा दावा ग्रामीण पोलिसांनी नेहमीच केला. पण, मागील दीड वर्षांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८२ हजार लिटर हातभट्टी व तब्बल आठ लाख लिटर गूळमिश्रित रसायन आणि विविध प्रकारची दारू, वाहने असा दहा कोटींचा साठा जप्त केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

 

गुन्हेगारी वाढण्याच्या एकूण कारणांमध्ये व्यसन तथा दारू हे देखील एक प्रमुख कारण मानले जाते. बहुतेक गावांमध्ये दारूमुळेच कौटुंबिक कलह वाढल्याची स्थिती आहे. पोलिसांना दारूबंदी, अवैध व्यवसायांवर कारवाई, यासोबतच भरपूर कामे असतात. परंतु, ज्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला अवैध दारू निर्मिती, विक्री आढळले; पण ग्रामीण पोलिसांना ते दिसत नाही, अशी चर्चा आहे. काही गावांमध्ये दारूबंदी आहे, पण गावच्या शिवेवर दारू विक्री सुरू असल्याचेही नागरिक सांगतात.

 

बहुतेक ढाब्यांवर अवैधरीत्या दारू विक्री सुरू असल्याची बाब राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईतून उघड झाली आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुळेगावसह इतर तांड्यांवरील हातभट्टी निर्मिती कायमची बंद व्हावी म्हणून गांधीगिरीतून ‘ऑपरेशन परिवर्तन’ यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. ज्या ठिकाणी हातभट्टी तयार व्हायची, ती गावे पोलिस अधिकाऱ्यांना दत्तक दिली.

 

त्या ठिकाणी आठवड्यातून किमान तीनवेळा छापे टाकले जायचे. त्यामुळे नफ्यापेक्षा तोटाच अधिक होऊ लागल्याने अनेकांनी नाइलाजास्तव तो अवैध व्यवसाय बंद केला होता. पण, आता त्यातील अनेकांनी पुन्हा भट्ट्या पेटविल्याची चर्चा आहे. ग्रामीण पोलिसांकडून अवैध व्यवसायांबरोबरच गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय, पण अवैध हातभट्टी निर्मिती व गावोगावी होणारी विक्री बंद होण्यासाठी अजूनही म्हणावा तितका ठोस प्रयत्न दिसत नाही.

 

 

⚜️ *‘राज्य उत्पादन’ची दीड वर्षातील कामगिरी* ⚜️

1) दारूबंदी कायद्यांतर्गत २५६४ गुन्हे नोंद करून दोन हजार ३८७ संशयितांना केली अटक

 

2) ८२ हजार ४२ लिटर हातभट्टी अन्‌ आठ लाख लिटर गूळमिश्रित रसायन केले नष्ट

 

3) देशी, विदेशी दारू, बिअर, ताडी आणि ३१२ वाहनांसह आठ कोटींचा मुद्देमाल जप्त

 

4) मुळेगाव तांडा, गुळवंची, बक्षीहिप्परगा, दोड्डी तांड्यावरील हातभट्ट्यांवर कारवाई

 

5) २२ ढाब्यांवर छापे; विदेशी दारू व वाहने, असा दोन कोटींचा मुद्देमाल केला जप्त

 

शसनास अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचा प्रयत्न

सोलापूर विभागातील आमचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे अवैध दारूविरुद्ध परिणामकारक कारवाई करण्यात यश आले. यंदाही अवैध दारू विक्री व निर्मितीस प्रतिबंध करून शासनास अधिकाधिक महसूल मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.

*- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर*

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel