सोलापूर बातमीsolapurpolice

सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघे बेपत्ता; पोलिसांकडे तक्रार…

सोलापूर शहरातील एमआयडीसी परिसरातील राजू गांधी नगर, मजरेवाडी येथे राहणाऱ्या एकाच घरातील चार जण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी निसार सलीम सय्याद (वय २५) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली आहे…

शाहीस्ताबेगम अमीन सय्याद (वय २७), रा. भांडेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर
सलीम अमीर सय्याद (वय ४९), वडील
कु. इन्शा अमीन सय्याद (वय ०७), मुलगी
तैमुर अमीन सय्याद (वय ०६), मुलगा असे बेपत्ता झालेल्यांची नावे आहे.

हे सर्वजण ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी निसार सय्याद यांच्या राहत्या घरातून काहीही न सांगता निघून गेले. रात्री घरी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूच्या परिसरात आणि सर्वत्र शोध घेतला, मात्र ते कोठेही सापडले नाहीत. त्यानंतर आज बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. बेपत्ता व्यक्तींबाबत काही माहिती असल्यास तात्काळ खालील नंबरवर संपर्क साधावा:निसार सलीम सय्याद (भाऊ) : 9503353105

तपासी अंमलदार एम.पी. वाघमोडे (एमआयडीसी पोलीस ठाणे) : 7517517027

पोलिसांनी नागरिकांना या चौघांची माहिती मिळाल्यास त्वरित कळवण्याचे आवाहन केले आहे…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel