सोलापूर बातमीsolapurpoliceमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापुरात महिला सुरक्षा जनजागृतीसाठी पथनाट्य; भरोसा सेलचा पुढाकार…

सोलापूर १६ एप्रिल २०२६ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहराच्या महिला सुरक्षा विशेष कक्ष ‘भरोसा सेल’ आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज, केगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रमांतर्गत पथनाट्य सादर करण्यात आले.
हे पथनाट्य विडी घस्कुल, तरटी नाका परिसर, सिद्देश्वर मंदिर, सातरस्ता आणि चार पुतळा या ठिकाणी सादर करण्यात आले. या उपक्रमातून महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी न पडता तात्काळ भरोसा सेलची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.
भरोसा सेलमार्फत पती-पत्नी समुपदेशन करून कौटुंबिक वाद मिटवून संसार पुन्हा सुरळीत करण्याचे काम केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
हा उपक्रम पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशेष) डॉ. अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या पोलीस निरीक्षक स्नेह्य म्हेतर आणि भरोसा सेल टीम तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजच्या डॉ. अनुराधा मोकाशी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login