सोलापुरात एक्टिवा गाडी चोरी प्रकरणामधून दोन आरोपींची निर्दोष मुक्तता..!
यात हकीकत अशी की दिनांक 16-1-2022 रोजी फिर्यादी हे रूपभवानी येतील मारवाडी स्मशानभूमी येथे त्यांचे नातेवाईक मयत झाल्याकारणाने त्यांची अॅक्टिवा घेऊन गेले होते. स्मशानभूमी समोर एक्टिवा हॅण्डल लॉक लावून ते मयत करण्यासाठी गेले होते.मयत करून आल्यानंतर त्यांची एक्टिवा गाडी लावलेले ठिकाणी दिसली नाही आजूबाजूला शोधाशोध केल्यानंतर त्यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे भा.द.वी. कलम 379,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी सागर बाळू मोरे व महेश बाबासाहेब कांबळे यांना अटक करण्यात आलेली होती.
सदर प्रकरणांमध्ये दोन्ही आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य यांनी वकीलपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणांमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले होते.
यात आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. प्रथम वर्ग न्यायाधीश भोला साहेब यांनी वरील दोन्ही आरोपींची प्रत्येकी 15000 रू. जामिनावर निर्दोष मुक्तता केली आहे.
यात आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य, ॲड अजिंक्य शाक्य, ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले