सोलापूर राजकीय

सोलापुरात काँग्रेसची मशाल रॅली…

सोलापुरात मतदान चोरी विरोधात काँग्रेसची मशाल रॅली ; ‘मतदान चोर, खुर्ची सोड’ घोषणांनी सोलापूर दणाणले

सोलापूर : काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पार्टीला देश पातळीवर चांगलेच कात्रीत पकडले असून मतदान चोरीचा मुद्दा सध्या देशभर गाजत आहे याच पार्श्वभूमीवर सोलापुर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यदिनी सायंकाळी जोरदार मशाल रॅली काढून लक्ष वेधले.

यावेळी वोट चोरोंसे आझादी, हुकूमशहा से आझादी मतदान चोर, खुर्ची सोड, अश्या घोषणांनी सारा परिसर दणाणहून गेला होता. सोलापूर शहरातील बलिदान चौक येथे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून निघालेली ही रॅली सराफ कट्टा, माणिक चौक, दत्त चौक, नवी पेठ, मेकॅनिकी चौक, प्रभात टॉकीज मार्गे चार हुतात्मा पुतळा या ठिकाणी चार हुतात्म्यांना अभिवादन करून विसर्जित झाली.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की, आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायला चाललो आहोत. जो मतदानाचा अधिकार एका गरीब व्यक्तीपासून श्रीमंत व्यक्तीपर्यंत समान असतो. पण आज तोच मतदानाचा अधिकार चोरला जात आहे. या मातृभूमीची आत्मा ही लोकशाही आहे. आणि जर लोकशाहीच नसेल तर मातृभूमीही टिकणार नाही. मतदान चोरी विरोधात आंदोलन करणाऱ्या इंडिया आघाडीचे तब्बल तीनशे खासदारांना अटक करण्यात आली. हा प्रश्न फक्त विरोधी पक्षांचा नाही, तर हा आपला सर्वांचा आहे. लोकशाहीमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याकडे एकच शस्त्र आहे ते म्हणजे मतदान, आणि तेही जर चोरले गेले, तर आपल्याकडे उरणार तरी काय? म्हणून मी सांगतो, आपण स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढत आहोत. त्या लढाईसाठी सगळ्यांनी सज्ज राहिले पाहिजे. कोणी तरी तुमच्या हक्कासाठी लढतो आहे, आणि त्या लढाईला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. परवाच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन भाजपने कश्या प्रकारे मतदान चोरी केली पुराव्यासह दाखवून दिले. त्यांच्या वक्तव्याचा परिणाम देशभर उमटला, देशात मोठी चळवळ उभी राहिली. लोकांचा प्रचंड पाठिंबा व समर्थन मिळत आहे. त्याच अनुषंगाने आज आम्ही मशाल रॅली काढली आहे. १५ ऑगस्टच्या निमित्ताने मी विनंती करतो या देशाला ज्या हुकूमशहाने आपल्या मुठीत ठेवले आहे, त्या हुकूमशाहीच्या विळख्यातून देशाला मुक्त करायचे आहे. या लढाईसाठी आणि लोकशाही वाचविण्यासाठी पाठिंबा द्या, कारण लोकशाही वाचवणे म्हणजेच देश वाचवणे आहे.

सोलापूर शहर हे हुतात्म्यांचे शहर आहे. चार हुतात्मे आणि शंकर शिवदारे सारख्या अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरात मार्शल लॉ पुकारला होता. भाजपवाले इतिहास विसरतात त्यांचा इतिहास २०१४ पासून सुरू होतो.

आपल्या देशाचे पंतप्रधान कमकुवत आहेत म्हणून डोनाल्ड ट्रन्फ वारंवार धमक्या देतो टॅरीफ पे टॅरीफ लावत आहे. सोलापुरातील टेक्सटाइल उद्योगाची जवळपास २५० कोटी निर्यात आणि त्याच बरोबर इतर अनेक उद्योगांची निर्यात थांबली आहे. त्याला जबाबदार पंतप्रधान मोदी आहेत. स्व. इंदिराजी गांधींनी ज्याप्रमाणे अमेरिकेला आपला कणखरपणा दाखविला ते मोदींना करता येईना.

यावेळी माजी माहापौर संजय हेमगड्डी, अरिफ शेख, प्रवक्ते प्रा, अशोक निम्बंर्गी, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विनोद भोसले, नगरसेविका परविन इनामदार, अनुराधा काटकर…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel