सोलापुरात जय हिंद लोक चळवळीच्या वतीने विद्यार्थ्यांची योग स्पर्धा संपन्न
जागतिक योग दिनाचा औचित्य साधून जय हिंद लोक चळवळ सोलापूरच्या वतीने कवठे येथील श्री संत गाडगेबाबा आश्रम शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी योग स्पर्धा संपन्न झाली. यावेळी योगा प्रशिक्षकांचा सन्मानही करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जय हिंद लोकचळवळीचे श्री सुमित भोसले, संस्थेच्या उपाध्यक्ष सौ लक्ष्मी पाटील, सचिव श्री गणेश पाटील, अक्षय पाटील, शैला पाटील, आदित्य पाटील, योग प्रशिक्षक अनिता कोडमूर आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सुमित भोसले यांनी योगाचे महत्त्व सांगितले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. या हेतूनेच ही स्पर्धा भरवण्यात आल्याचं सुमित भोसले यांनी सांगितले.
योग प्रशिक्षक अनिता कोडमोल यांनी योगासने शिकवली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे योग स्पर्धा पार पडली. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आली. यावेळी योग प्रशिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास सुर्या धप्पाधुळे, सुहास मस्के व स्नेहल भोसले, झिशान मुजावर, दिपक धामूरे, अनिरुध्द दहिवडे, लक्ष्मीकांत शिवशेट्टी, रमजान पाटील, अमोल कोटगोंडे व सुनिल अरवत आदी उपस्थित होते.