सोलापूर बातमीक्राईमसोलापूर क्राईम

सोलापुरात तब्बल पावणे तीन कोटींची फसवणूक ; पती पत्नी अडकले

सोलापूर : मागील चार वर्षात बीशीच्या नावाखाली सोलापुरातील 131 जणांची तब्बल दोन कोटी 69 लाखाची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून फसवणूक करणाऱ्या पती-पत्नी विरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी लक्ष्मण आवार वय 37 वर्षे, साईबाबा चौक यांनी फिर्याद दिली आहे. यातील श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा वय 44 वर्षे, खुशी रेसिडेन्सी, गीता नगर, थोरात हॉस्पीटल जवळ, सोलापूर व त्याची पत्नी सुजाता रमेश चिप्पा वय 40 वर्षे, या दोघांनी मिळून दि. 1/11/2020 पासुन ते 30/04/2024 दरम्यान बीशी चालवून लोकांचा विश्वास संपादन केला. जास्ती रक्कम व्याजा पोटी पैसे मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून श्री ओम साई फायनन्सच्या माध्यमातुन गुंतवणुकदारांच्या ठेवींच्या पैशाचा अपहार करुन फिर्यादी व यातील गुंतवणुक करणा-या एकुण 131 व्यक्तिचा विश्वासघात करुन 2,69,19,000 (दोन कोटी एकोणसत्तर लाख एकोणीस हजार रु.) इतकी फसवणुक केलेली आहे. तसेच मला वारंवार धमकी देवु नका तसे केल्यास मी आत्महत्या करतो व त्यास तुम्ही सर्वजण जबाबदार राहाल अशी आम्हा सर्व गुंतवणुकदारांना धमकी देत होता. म्हणुन फिर्यादी वरील 131 व्यक्तीचा प्रतिनिधी म्हणुन रमेश चिप्पा त्याची पत्नी सुजाता चिप्पा या दोघांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel