सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिका

सोलापुरात दहा वाल्मिकी कराड;यांचा आका कोण?

वरील विषयास अनुसरून निवेदन देण्यात येते की, सोलापूर शहरातील तेलंगी पाच्छा पेठ, सिध्देश्वर पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ, बेगम पेठ, अंत्रोळीकर नगर, अशोक चौक परिसर व शहरातील इतर ठिकाणी टोलेजंग इमारती महापालिकेची बोगस बांधकाम परवानगी घेऊन उभे केल्याने महापालिकेने अनेक इमारतींची चौकशी करून सदर इमारतीला देण्यात आलेले बांधकाम परवाने हे बेकायदेशीर आहे म्हणून काही महापालिकेतील अधिकारी व इंजिनियर यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली आहे. पण प्रत्यक्षात पाहिल्यास बोटावर मोजण्याइतक्या अधिकारी तसेच इंजिनिअरवर कारवाई झालेली आहे. यात प्रत्यक्षात अधिकारी, कर्मचारी, इंजिनिअर व बिल्डर, डेव्हलपर्स यांना आरोपी करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून महापालिकेचे कागदपत्रे चोरून नेणे, अधिकारी-कर्मचारी यांनी चुकीच्या पद्धतीने आवक-जावक करणे, महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या मारणे, एफएसआय नसतांना सुध्दा बिल्डींगला वाढीव बांधकाम परवाना देणे, उंच इमारती स्पेशल बिल्डींगच्या नियमात गेल्यानंतर आजूबाजूला जागा न सोडणे, पुरेसे पार्किंग नसणे आणि अशा प्रकारे इमारतींना बेकायदेशीर बांधकाम व वापर परवाना देऊन या ठिकाणी फ्लॅट खरेदी करणाऱ्या असंख्य फ्लॅटधारकांची करोडो रूपयांची फसवणुक करण्याचे काम महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांचेशी हातमिळविणी करीत बिल्डर, इंजिनियर व डेव्हलपर्स यांनी केलेले आहे. सदरचा हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा या सर्व लोकांकडून झालेला असतांना सुध्दा फ्लॅट धारकांची फसवणुक झालेली असतांना फक्त २ ते ४ लोकांवर कारवाई करून हे चालणार नाही. तर यातील महापालिकेतील आणखी काही अधिकारी व कर्मचारी या कटात सामील आहेत का याची चौकशी करावी. तसेच ज्या-ज्या विल्डिंगला ज्या इंजिनिअर्सनी आपली सर्टिफिकेट जोडलेली आहे त्यांचे परवाना रद्द करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. बिल्डर्स व डेव्हलपर्स यांनी फ्लॅट विकून पुर्ण पैसे घेऊन फ्लॅटधारकांना अजून फ्लॅट खरेदी दिलेले नाही किंवा ते भविष्यात खरेदी होण्याची शक्यताही खूप कमी आहे. बेकायदेशीर बांधकाम परवाना प्रकरणातील इमारतींना वापर परवाना देणे हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही म्हणून खरेदी-विक्री करणे शक्य होणार नाही म्हणून बिल्डर्स व डेव्हलपर्स

यांच्यावर सुध्दा गुन्हे दाखल करून फ्लॅटधारकांबाबत योग्य तो कायदेशीर विचार करावा. तरी आपणास विनंती आहे की, बोगस बांधकाम परवाना प्रकरणात मपातील आणखीन कोण-कोण अधिकारी व कर्मचारी सामील आहेत त्यांची चौकशी करावी, चौकशीअंती मपातील अधिकारी, कर्मचारी व इंजिनियर, बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करावी. तसे संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत ही नम्र विनंती…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel