सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

सोलापुरात प्रहार कडून रक्तदान शिबिर संपन्न….

संपूर्ण महाराष्ट्रभर 31 मे ते 26 जुलै या कालावधीत महापुरुषांना अभिवादन देण्यासाठी व महाराष्ट्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रहार ने संपूर्ण राज्यभर रक्ताची मोहीम हाती घेतली आहे.
प्रहारचे सर्वेसर्वा वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी तसेच प्रहार जिल्हा प्रमुख दत्ता भाऊ मस्के पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातून प्रहारच्या माध्यमातून जवळजवळ 50 च्या वरती रक्तदात्यांनी रक्तदान करून या रक्तदानाच्या मोहिमेला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात झाली बच्चुभाऊंच्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्याने यात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद घेतला असून वेगवेगळ्या तारखांना पुढील आठवडाभरात,प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर मोठ्या ताकतीने राबवून इतर राजकारण्यांच्या मतदानापुरताच लोकांचा वापर करून आपल्या फायद्यासाठी हव्या त्या गोष्टी करणाऱ्या या राजकारण्यांच्या नालायक वृत्तीला छेद देत एक अनोखी संकल्पना लोकनेते बच्चुभाऊ कडू यांनी राबवली,आणि महाराष्ट्रात रक्तचा तुटवडा भरून काढण्यासाठी स्वतः रक्तदान करून या मोहिमेत सहभाग नोंदवला प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनीही काल स्वतःच्या वाढदिवसा दिवशी या मोहिमेत रक्तदान करून सहभाग घेतला,अजित भाऊ कुलकर्णी प्रहार सोलापूर शहराध्यक्ष,जमीर भाई शेख संपर्कप्रमुख सोलापूर,खालीद भाई मनियार कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे केशव जावळे औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष फिरोज पठाण उत्तर सोलापूरचे तालुकाध्यक्ष,अमोल मस्के पाटील,युनूस भाई पठाण, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला…
उत्तर सोलापूर तालुक्यातून या रक्तदान मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार या प्रसंगी प्रहार पदाधिकारी यांनी मानले आहे…
चला रक्तदान करूयात अनेकांचे प्राण वाचवूया रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel