क्राईमन्यायालय निर्णयमहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरात बेकादेशीर शिंदी विक्री , शेत मालकास अटकपूर्व जामीन – ad. शशी कुलकर्णी

सोलापूर येथील मौजे कुरघोट ता.द. सोलापूर येथील सिंदीबनात बेकायदेशीररित्या मानवी आरोग्यास हानिकारक अशी ताडी/शिंदी जवळ बाळगून ती नोकरामार्फत विक्री केल्याबाबतच्या दाखल गुन्ह्यात शेतमालक अन्वरपाशा चाँदपाशा पटेल वय-४३, रा. कुरघोट, ता.द. सोलापूर, सोलापूर यास सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

याची हकीकत अशी की, दि.३०/०१/२०२४ रोजी मंद्रुप पोलीसांना खबर मिळाली की, मौजे कुरघोट ता.द. सोलापूर येथील सिंदीबनात काही व्यक्ती बेकायदेशीररित्या मानवी आरोग्यास हानिकारक अशी ताडी/शिंदी विक्री करत आहेत. त्याप्रमाणे पोलीसांनी सदर ठिकाणी धाड टाकली असता त्यांना २०० लीटरचे दोन बॅरल, ५० लीटरचे कॅन असे ताडी/शिंदी सदृष रसायन मिळून आले. त्याबाबत तेथील हजर इसम चेप्याला विरागौड किश्तय्या वय-५६, हा व्यक्ती जागेवर मिळून आला. त्याचेकडे चौकशी केली असता, त्याने सदरचे कृत्याबाबत माहिती देऊन, सदरचे शेत शेतमालक अन्वरपाशा चाँदपाशा पटेल याचे असल्याचे सांगितले. त्यामुळे सदर व्यक्ती व शेतमालक अन्वरपाशा पटेल यांचेविरुध्द भा.द.वि. ३२८ प्रमाणे गुन्हा दाखल केला व हजर व्यक्ती चेप्याला विरागौड किश्तय्या याला अटक करून पुढील कारवाई केली. सदर घटनेनंतर शेतमालक याच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांनी अॅड. शशी कुलकर्णी यांचेमार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधिश आर. एन. पांढरे यांचेसमोर झाली.

त्यामध्ये आरोपीच्या वकीलांनी शेतमालक अन्वरपाशा पटेल यांच्यामार्फत युक्तीवाद केला की, यातील शेतमालकाने कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य केले नाही, मंद्रुप पोलीसांनी कोणतीही शहानिशा न करता गुन्हा दाखल केलेला आहे, शेतमालक नेहमीच कायद्याचे पालन करतात, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरुध्द जाऊन ते कोणतीही कृत्ती करत नाहीत, गुन्ह्यातील कलमे आरोपीस लागू होत नाहीत, शेतमालकाविरुध्द गुन्हाच होऊ शकत नाही. सदरचा युक्तीवाद विचारात घेऊन न्यायालयाने शेतमालक अन्वरपाशा पटेल यांना अटी व शर्तीसह अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सदरकामी आरोपी शेतमालकातर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. प्रसाद अग्निहोत्री, अॅड. प्रणव उपाध्ये, अॅड. आदित्य आदोने यांनी काम पाहिले. तर सरकार पक्षातर्फे अॅड. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel