महाराष्ट्र

सोलापुरात मटका माफियांना पोलिस आयुक्तांचा दणका

तब्बल 7 जणांच्या टोळीला केलं तडीपार

सोलापूर( प्रतिनीधी ):- सोलापूर शहरातील मटका टोळीतील इसम नामे, १. आकाश राम कामाठी, वय-२६ वर्षे, रा. खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर (टोळीप्रमुख), २. अप्पू उर्फ व्यंकप्पा भिमण्णा रद्दडगी, वय-३० वर्षे, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर, ३. राघवेंद्र बसवराज ममदापूरे, वय-३९ वर्षे, रा.१६८, समरा नगर, सोलापूर, ४. सिद्राम भिमराव बुगडे, वय-४८ वर्षे, रा. ६२, गांधी नगर झोपडपट्टी क्र. ०७, अक्कलकोट रोड, सोलापूर, ५. प्रभाकर कणकय्या बोडा, वय-४६ वर्षे, रा. १६७०, महालक्ष्मी चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर, ६. अंबादास हणुमंत मांदवाद, वय-५४ वर्षे, रा. ७१८, सागर नगर, मजरेवाडी, सोलापूर, ७. सिध्देश्वर चंद्रशेखर टेंगळे, वय-४६ वर्षे, रा. भारतीय नगर, शांती नगरजवळ, सोलापूर यांचेविरुध्द सन २०१९, २०२०, २०२२, २०२३ व २०२४ या कालावधीमध्ये महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. यातील टोळीप्रमुख हा त्याचे साथीदारांसह मुंबई व कल्याण नावाचा अवैध मटका जुगार चालवत आहे. सदर इसमांवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. १०७०/२०२४ दि.१७/०४/२०२४ अन्वये, टोळीतील इसम नामे, १. आकाश राम कामाठी, वय-२६ वर्षे, रा. खड्डा तालीम, लाल बहादूर शास्त्री नगर, पोटफाडी चौक, सोलापूर (टोळीप्रमुख), २. अप्पू उर्फ व्यंकप्पा भिमण्णा रद्दडगी, वय-३० वर्षे, रा. मल्लिकार्जुन नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर, ३. राघवेंद्र बसवराज ममदापूरे, वय-३९ वर्षे, रा.१६८, समरा नगर, सोलापूर, ४. सिद्राम भिमराव बुगडे, वय-४८ वर्षे, रा. ६२, गांधी नगर झोपडपट्टी क्र. ०७, अक्कलकोट रोड, सोलापूर, ५. प्रभाकर कणकय्या बोडा, वय-४६ वर्षे, रा. १६७०, महालक्ष्मी चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर, ६. अंबादास हणुमंत मांदवाद, वय-५४ वर्षे, रा. ७१८, सागर नगर, मजरेवाडी, सोलापूर, ७. सिध्देश्वर चंद्रशेखर टेंगळे, वय-४६ वर्षे, रा. भारतीय नगर, शांती नगरजवळ, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे. त्यांना तडीपार केल्यानंतर इंडी, विजयपुर, कर्नाटक येथे सोडण्यात आलेले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login