सोलापुरात मराठा समाजाचा मोठा पाऊल….
आजकाल मराठा समाजामध्ये विवाह सोहळा जमवताना वधू – वरांसाठी काही अवास्तव अटी घातल्या जात आहेत. यामुळे विवाह जमण्यात अडचणीत निर्माण होत आहेत. विवाह जमवतांना मुला मुलिंचे कर्तुत्व पहावे. केवळ उत्पन्नाचे किंवा मालमत्तेचे मूल्यांकन करू नये. तसेच विवाह सोहळा करताना कोणताही डोमडोल, थाटमाट न करता साधेपणाने विवाह सोहळा साजरे करण्याची प्रथा मराठा समाजाने सुरू करावी असा सूर निर्मलकुमार फडकुुले सभागृहात मराठा सेवा संघाच्या वधू वर मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी काढला
मराठा सेवा संघाच्यावतीने रविवार ( दि.9 ) जून रोजी निर्मलकुुमार फडकुुले सभागृहात वधुुवर मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मराठा सेवा संघाचे विभागिय अध्यक्ष प्रशांत पाटील होते.
यावेळी विचारपिठावर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सुर्यकांत पवार, कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके, मराठा पंतस्थेचे चेअरमन अमोल शिंदे, माजी उपमहापौर नानासाहेब काळे, राज्य बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष दत्तामामा मुळे, तुळजापुरचे उपनिबंधक दत्तत्रय मोरे, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष सोमनाथ राऊत, अॅड. बाबासाहेब जाधव, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते, महोदव गवळी, जिजाऊ बिग्रेडच्या उज्वला साळुंखे उपस्थित होते.
यावेळी प्रशांत पाटील सदाशिव शेळके, अमोल शिंदे, दत्तामामा मुळे यांची भाषणे झाली. प्रारंभी जिजाऊ पुजन करण्यात आले. गोवर्धन गुंड यांनी जिजाऊ वंदना सादर केली. उपस्थित मान्यवरांचा मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक भाषणातून सदाशिव पवार यांनी वधुवर मेळावा घेण्या मागची भुमिका विशद केली. यंदाच्या वधुवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. शहर जिल्ह्यातून तब्बल पाचशेच्या असपास वधु-वर आणि त्यांचे पालक उपस्थित होते.उद्याटन सोहळ्यानंतर नोंदणी केलेल्या वधु-वरांचा परिचय अभिंजली जाधव, संजिवनी मुळे, वर्षाराणी पवार, उज्वला साळुंखे, लत्ता ढेरे यांनी करून दिला. वधू- वरांची नोंदणीसाठी मनाली जाधव, श्रधा माने, नागनाथ पवार, दिपाली माने, सानिका पवार यांनी परिश्रम घेतले.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रकाश ननवरे, आर.पी.पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, दीपक शेळके,परशुराम पवार, नवनाथ कदम, डॉ. संजीवनी मुळे, रमेश जाधव, दत्ता जाधव, नितीन चव्हाण यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन आणि अभार लक्ष्मण महाडिक यांनी मानले.