सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर निधन वार्ता
सोलापुरात शेतात काम करत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू …
उत्तर सोलापूर येथील एकरुख येथे शेतात काम करत असताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की आज दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास एकरुख तालुका उत्तर सोलापूर येथे शेतात काम करत असताना उजव्या पायात साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
वंदना तानाजी उडणशिवे वय वर्ष 45 राहणार एकरुख तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
पती तानाजी उडणशिवे यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले असता उपचारापूर्वीच मयत झाल्याचे समजले.
सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.
सुदर घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे