महाराष्ट्र

सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे यांची बसवारुढ मठास भेट…

मठाधिपतींचे घेतले आशीर्वाद, स्वामींनी दिले आशीर्वाद शुभेच्छा...

विमानतळ परिसरातील कस्तुरबा नगर येथील श्री श्री श्री सद्गुरु बसवारुढ महास्वामीजी मठात सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार कुमारी प्रणिती शिंदे यांनी बुधवारी भेट देत आशीर्वाद घेतले.

मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाचे मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र आप्पाजी यांचे शुभ आशीर्वाद घेतले. दरम्यान लोकसभेचे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आप्पाजींचे आशीर्वाद घेतले होते. त्यावेळेस श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी आमदार प्रणिती शिंदे ह्या सोलापूर लोकसभेमध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज रोजी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आप्पाजींचे शुभ आशीर्वाद घेतले याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, नगरसेवक बाबा मिस्त्री, काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निम्बर्गी, महादेव कोगनुरे, आदींची उपस्थिती होती यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी आणि मठाधिपती श्री अभिनव शिवपुत्र अप्पाजी यांनी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन सन्मान केला. सोलापूर शहराच्या शैक्षणिक सामाजिक औद्योगिक धार्मिक अशा अन्य क्षेत्रामध्ये प्रणिती शिंदेने कार्य करावे यासाठी आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी सदैव असल्याचे यावेळी मठाचे संस्थापक श्री ईश्वरानंद आप्पाजी यांनी यावेळी आशीर्वाचन केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel