सोलापूरचे विक्रम देशमुख यांची भाजपच्या राज्य परिषदेवर निवड…

भाजपाच्या राज्य परिषदेवर विक्रम देशमुख यांची निवड
सोलापूर : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य परिषदेवर भाजपाचे माजी शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांची निवड करण्यात आली.
विक्रम देशमुख यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस पदावर सुमारे २० वर्षे काम केले आहे. तसेच सोलापूर शहराचे शहर संघटन सरचिटणीस, शहर सरचिटणीस, शहर जिल्हाध्यक्ष, लोकसभा निवडणूक प्रमुख, माळशिरस विधानसभा निवडणूक प्रमुख अशा पदांवर काम केले आहे. २०१७ ची महानगरपालिका, २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्याचबरोबर राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या निवडणुकीच्या नियोजनातही विक्रम देशमुख यांनी काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष (पूर्व) शशिकांत चव्हाण, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) चेतनसिंह केदार यांनी अभिनंदन केले आहे…