सोलापूरच्या राजकारणातील केंद्रबिंदू फारूक शाब्दी ठरणार गेम चेंजर…
फारूक शाब्दी ऐनवेळी गेम फिरवणार असल्याची खात्रीशीर माहिती...

महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूरचे राजकारण भयंकर तापले आहेत.सर्वच पक्षांनी निवडणुकीत जोर लावला आहे.सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत फारूक शाब्दीनी राजकारणाला जोरदार धक्का देत वेगळे राजकीय वळण दिले आहे.एमआयएम पक्षाला सोनेरी दिवस आणणारे फारूक शाब्दी हे आता काही दिवसांत पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे.कोणत्या पक्षातुन सक्रिय होणार याचं गूढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे.पालकमंत्र्यांनी स्वतः एका बैठकीत फारूक शाब्दी यांची चर्चा केली होती,त्यावेळी स्थानिक आमदारही बैठकीत उपस्थित होते.फारूक शाब्दीमुळे कोणत्या उमेदवाराची बत्ती गुल होणार,आणि कुणाला लॉटरी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
प्रत्येक पक्षाला हवे असणारे फारूक शाब्दी निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक उमेदवारांचे राजकिय भवितव्य ठरविणार आहेत.फारूक शाब्दी म्हणेल ती पूर्वदिशा असे चित्र या महानगरपालिका निवडणुकीत निर्माण होणार आहेत.शाब्दी पुन्हा एकदा येणार आणि राजकारणात सक्रिय होणार आहेत.फारूक शाब्दी यांच्या कमबॅकमुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे तर काही उमेदवारांचे आनंद द्विगुणीत झाले आहे.
सोलापूर मधील मुस्लिम बहुल मतदार संख्या असलेल्या प्रभागात आजही फारूक शाब्दी यांची जोरदार चर्चा केली जात आहे.शाब्दी यांनी एमआयएम पक्षाचा राजीनामा दिला नसता तर आज चित्र वेगळे झाले असते आणि एमआयएम पक्ष महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकर ठरला असता.सूडबुद्धीने राजकारण करणाऱ्याना कळून चुकले आहे, फारूक शाब्दी सारखा कोहिनुर हिरा हातातून गेला.राजकारण करणारे पावसाळी बेडूक मूग गिळून गप्प आहेत.जिल्हाध्यक्ष पदाची मागणी करणारे नेते एका प्रभागापुरता मर्यादित राहीले आहेत.जिल्हाध्यक्ष कसा असतो,त्याची व्याख्या त्या स्वयंघोषित जिल्हाध्यक्षकांला काय आहे हे माहितीच नाही.
सोलापूर।महानगरपालिका निवडणुकीत फारूक शाब्दी हे शेवटच्या पाच दिवसांत राजकीय गेम फिरवणार आहेत.सोलापूर शहरातील वेगवेगळ्या प्रभागात जाऊन स्वतः फारूक शाब्दी हे उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.निवडणुकीचा खरा खेळ शेवटच्या दोन दिवसांत फिरवला जाणार आहे.शाब्दी यांच्या ताकदीने सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे राजकीय रिंगण आणखीन मजेदार होणार आहे.2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त टक्कर देणाऱ्या फारूक शाब्दी यांची चर्चा फक्त सोलापूर पुरता मर्यादित नाही तर मुंबईत सुद्धा फारूक शाब्दी यांचं नाव घेतल जातंय. स्वतः पालकमंत्र्यानी एका बैठकीत फारूक शाब्दी यांचा नाव घेतलं होतं. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच रिंगण फारूक शाब्दी यांच्यामुळेच रंगतदार होणार आहे,आणि कमबॅक करत भल्या भल्याना घाम फोडणार आहेत.



