सोलापूर बातमीमनोरंजनमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

सोलापूरला लवकरच आधुनिक नाट्यगृहाची भेट प्रशांत दामले यांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक…

शहरातील अशोक नगर (आयटीआय कॉलेज शेजारी) येथे प्रस्तावित असलेल्या नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भात सोलापूर महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाट्यकलाकार प्रशांत दामले यांची विशेष उपस्थिती लाभली. आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली.
बैठकीत प्रस्तावित नाट्यगृहाची रचना, त्यामध्ये असावयाच्या आधुनिक सुविधा, कलाकार व प्रेक्षकांच्या गरजा तसेच भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांचा विचार करून नाट्यगृहाची उभारणी कशा पद्धतीने करावी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रशांत दामले यांनी आधुनिक नाट्यगृह उभारणीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
या नाट्यगृहामुळे शहरातील कलाकारांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार असून सांस्कृतिक चळवळीला नवी दिशा मिळणार आहे, असे प्रशांत दामले यांनी सांगितले.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, दादा साळुंखे, प्रशांत बडवे तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट
सोलापूरच्या सांस्कृतिक विकासासाठी हे नाट्यगृह महत्त्वपूर्ण ठरणार असून शहराच्या कला, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्राला नवी उभारी मिळेल.
सुभाष देशमुख, आमदार दक्षिण सोलापूर

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel