सोलापूर बातमीsolapurpoliceक्राईममहाराष्ट्र

सोलापूरात पोलिसांचा योग्य तपास ; आरोपीला सोलापूर कोर्टाने सुनावली ही सजा…!

सोलापूर – संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून ३ महिन्यांची साधी कैद व १६,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १५ दिवसांची कैद भोगावी लागणार आहे.

प्रकरणाची हकीकत अशी की,

दि. १४/०३/२०२० रोजी सकाळी ११.०० वा. अल्पवयीन मुलगी वय १७ वर्षे ०८ महिने, ही संगमेश्वर कॉलेज, सातरस्ता, सोलापूर येथे अकरावीच्या पेपर देण्यासाठी गेली होती. पेपर संपल्यानंतर ती घरी परत न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊन तिच्याकडून माहिती घेतली असता, आरोपी सौरभ संजय पाताळे, वय २१ वर्षे, रा. घर क्र. ५४६ नॉर्थ कसबा, सोलापूर हा तिच्याशी कॉलेजमध्ये ओळख वाढवून तिच्याशी जवळीक साधत असल्याचे तसेच तिचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले.

सदर प्रकरणाबाबत मुलीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन सदर बझार येथे भा.दं.वि. कलम ३५४ व POCSO Act कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सपोनि चानकोटी यांनी केला. तपासादरम्यान संबंधित साक्षीदारांचे जबाब, उपलब्ध कागदपत्रे व इतर पुरावे संकलित करून तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.

प्रकरणातील जबाब व तपास कागदपत्रांमध्ये असलेल्या तथ्यांच्या आधारे मा. न्यायाधीश जे. एम. मोहिते साहेब यांनी आरोपी सौरभ संजय पाताळे यास IPC कलम ३५४ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व १६,०००/- दंड, तसेच POCSO Act कलम १२ अंतर्गत ३ महिन्यांची कैद व १६,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही दंडाची रक्कम न भरल्यास प्रत्येकी १५ दिवसांची अतिरिक्त कैद भोगावी लागणार आहे अशी शिक्षा सुनावली.

सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती कविता बागल यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून पोहवा प्यारन नदाफ यांनी काम पाहिले व दोषसिद्धी कक्षाकडील सपोनि राजेश डोकवाड, पोउपनि रामु मुंदडे, मपोहवा मैदाड यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासामुळे व न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे योग्य प्रकारे सादर केल्यामुळे आरोपीस शिक्षा झाली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel