राजकीयसोलापूर राजकीय

सोलापूरात युवक काँग्रेसतर्फे राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा….

सोलापूर – आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महात्मा गांधी पुतळा, रेल्वे स्टेशन परिसर येथे घेण्यात आला. युवक काँग्रेसने मोदी सरकारच्या रोजगार धोरणांवर तीव्र निशाणा साधत तरुणांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याचा आरोप केला.

यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष गणेश डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी हातात फलक, बॅनर घेऊन “रोजगार द्या – बेरोजगारी हटवा” अशा घोषणाबाजी केली.

नेत्यांनी आपापल्या भाषणातून गेल्या दहा वर्षांत देशातील बेरोजगारी प्रचंड वाढल्याचे सांगितले. नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आजही लाखो तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारी भरती प्रक्रिया थांबलेली असून खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचा आरोप करण्यात आला.

युवक काँग्रेसने बेरोजगार तरुणांच्या वतीने सरकारकडे तात्काळ रोजगार हमी योजना राबवावी, रिक्त सरकारी पदांची भरती त्वरीत करावी तसेच उद्योजकतेसाठी विशेष योजना लागू कराव्यात, अशी मागणी केली.

या आंदोलनात युवक काँग्रेस पदाधिकारी, महिला काँग्रेस कार्यकर्त्या तसेच अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली…

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel