सोलापूर बातमीसोलापूर धार्मिक

सोलापूरात रविवारी सकाळी निघणार 68 लिंग पदयात्रा

68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनचा उपक्रम

प्रतिवर्षाप्रमाणे श्रावणमास निमित्त ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाचे दर्शन घेण्यासाठी रविवारी पदयात्रेचे आयोजन 68 लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन यांच्यावतीने करण्यात आल्याची माहिती भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांनी दिली.
रविवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता श्री सिद्धेश्वर मंदिर येथून पदयात्रेला प्रारंभ होणार बाळी वेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे पदयात्रेचा समारोप होणार आहे.
श्रावण महिन्यात शहर परिसरातील 68 लिंगाचे दर्शन घेतल्याने 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचे पुण्य लाभते अशी सोलापूरकरांची श्रद्धा आहे. या पदयात्रेची सुरुवात 1975 साली कै. उमाकांत सावळगी, कै. शरणप्पा मुद्देबिहाळ, संगप्पा बुरकुले, पावडेप्पा भुशेट्टी यांनी केली. यंदाचे या पदयात्रेचे 49 वर्ष आहे. सध्या बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते.
या पदयात्रेत शहराबरोबरच दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट सुमारे 300 भाविक सहभागी होतात. या पदयात्रेची सुरुवात श्री सिद्धेश्वर मंदिर येथून होऊन डफरीन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मिल (उमा नगरी), बर्फ कारखाना, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुणे नाका, सम्राट बाळीवेस, चाटी गल्ली, मीठ गल्ली, मधला मारुती, माणिक चौक समाचार चौक, पंचकट्टा, जिल्हा परिषद, होम मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुप्रजा पावभाजी, सुभाष चौक, चौपाड मार्गे बाळीवेस येथील श्री म ल्लिकार्जुन मंदिर येथे समारोप होणार आहे.
ज्या भाविकांना पदयात्रेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी या ९४२०६०८४७० क्रमांकावर संपर्क साधावा आणि पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वीरशैव व्हिजन संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel